Friday, June 29, 2018

अक्षय गाणें

गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबद्दल अनेक पुस्तकें लिहिली गेली आहेत. विशेषतः राजू भारतन आणि हरिष भिमाणी यांनी लता दिदींच्या सांगीतिक कारकिर्दीचा सखोल आढावा घेतला आहे. परंतु लताजींच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, त्यांच्या घरगुती वावराबद्दल फारसे ज्ञात नाही. त्यांची जिवलग मैत्रीण आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका पद्मा सचदेव यांचे पुस्तक ही उणीव भरून काढते. "ऐसा कहांसे लाऊं" या मूळ हिंदी चरित्राचा जयश्री देसाई यांनी "अक्षय गाणें" या नावाचा अतिशय सरस अनुवाद केला आहे. 


पुस्तक काहीसे डायरी पद्धतीने लिहिलेले आहे. त्यातुन केवळ लताजीच नव्हे तर संपुर्ण मंगेशकर कुटुंबातील व्यक्ती -- माई मंगेशकर ते आदिनाथ मंगेशकर -- आपल्या अनेक पैलूंनिशी सामोरे येतात. महत्त्वाचे म्हणजे यात जवळपास 50 दुर्मीळ फोटो आहेत, जे बहुतांश तरी मी यापूर्वी पाहिले नव्हते, उदाहरणार्थ, लताजींनी काढलेले फोटो आणि अप्रतिम पेंटिंग्ज.
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळाबद्दल रुची असणाऱ्या आणि मंगेशकर कुटुंबातील अलौकिक गात्या गळ्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.

No comments: